शेगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज शेगाव दौर्यावर आले असता, त्यांनी श्री गजानन महाराज संस्थान येथे ‘श्रीं’चे दर्शन घेतले.
याप्रसंगी देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत विधान परिषद सदस्य प्रसाद लाड, आमदार डॉ. संजय कुटे, आमदार अँड. आकाश फुंडकर, आमदार श्रीमती श्वेताताई महाले, जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती भाग्यश्री विसपुते या मान्यवरांची उपस्थिती होती.
श्री. गजानन महाराज संस्थानचे विश्वस्त निलकंठ पाटील यांनी त्यांचे शाल श्रीफल व महाप्रसाद देऊन स्वागत केले. संस्थानतर्फे उपमुख्यमंत्र्यांचे औक्षण करण्यात आले.