Home क्राईम दीर्घ आजारामुळे आले नैराश्य; कंटाळून जगातून वृध्द एक्झिट

दीर्घ आजारामुळे आले नैराश्य; कंटाळून जगातून वृध्द एक्झिट


जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील तेली चौकात राहणाऱ्या ६५ वर्षीय वृध्दाने आजाराला कंटाळून गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना रविवारी ३० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता समोर आली आहे. याप्रकरणी रात्री ९ वाजता शनीपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अशोक कडू चौधरी वय ६५ रा. तेली चौक, जळगाव असे मयत झालेल्या वृध्दाचे नाव आहे.

याबाबत अधिक असे की, अशोक कडू चौधरी हे आपल्या कुटुंबियांसह तेली चौक परिसरात वास्तव्याला होते. दरम्यान गेल्या काही महिन्यांपासून दुर्धर आजारापासून त्रस्त होते. त्यामुळे ते काही दिवसांपासून तणावात व चिंतेत होते. असे असतांना त्यांनी रविवारी ३० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता घरात कुणीही नसतांना त्यांनी राहत्या घरातील फॅनला दोरीच्या मदतीने गळफास घेवून आत्महत्या केली. हा प्रकार नातेवाईकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी खाली उतरवून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोहेकॉ भागवत शिंदे हे करीत आहे.


Protected Content

Play sound