तीन गुन्हेगारांवर हद्दपारीची कारवाई; जिल्हा पोलीस अधिक्षकांचे आदेश

जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । खून, मारामारी यासारखे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या तिन गुन्हेगारांवर जिल्हा पोलीस अधिक्षक महेश्वर रेड्डी यांनी हद्दपारीची कारवाई केली आहे. आकाश उर्फ खंड्या सुकलाल ठाकूर (वय २३), पवन उर्फ बद्या दिलीप बाविस्कर (वय २३) व आकाश उर्फ आक्या ब्रो रविंद्र मराठे (वय २२, सर्व रा. तुकारामवाडी) अशी तिघांची नावे आहेत.

जळगाव शहरातील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी जिल्हा पोलीस दल अलर्ट मोडवर काम करीत आहे. वेळोवेळी प्रतिबंधात्मक कारवाई करुन देखील गुन्हेगारांच्या वर्तवणुकीत सुधारणा होत नसलेल्या रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर कारवाईचा बडगा उचचला जात आहे. दरम्यान, तुकारामवाडी परिसरातील आकाश उर्फ खंड्या ठाकूर याच्यावर सात, पवन उर्फ बद्या बाविस्कर याच्याविरुद्ध सहा तर आकाश उर्फ आक्या ब्रो मराठे याच्याविरुद्ध खूनासह चार गंभीर गुन्हे दाखल आहे. त्यांच्या हद्दपारीचा प्रस्ताव एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्याकडे पाठविला होता. हद्दपारीच्या प्रस्तावावर स्वाक्षरी झाल्यानंतर तिघांच्या हद्दपारीचे आदेश पारित होताच, एमआयडीसी पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाचे उपनिरीक्षक राहूल तायडे, चंद्रकांत धनके, योगेश बारी, किशोर पाटील, विकास सातदिवे, योगेश घुगे यांच्या पथकाने तिघांना जिल्ह्यातून हद्दपार केले.

Protected Content