संत गजानन महाराजांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान

शेगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | आषाढी वारीसाठी भाविकांना विठुरायाच्या पंढरीची ओढ लागलेली असते .त्यामुळे भाविक पायदळ वारीसाठी सज्ज झाली असून आज 13 जून रोजी विदर्भची पंढरी संतनगरी शेगाव येथून श्री गजानन महाराजांच्या संस्थांच्या पालखीचे ब्रह्म वृंदांच्या हस्ते विधिवत पूजन करून श्रींच्या सेवाधारी व्यवस्थापकीय विश्वस्तांच्या उपस्थितीत सकाळी साडेसात वाजता विठुरायाच्या दर्शनासाठी प्रस्थान झाली आहे.

जय गजानन श्री गजानन विविध अभंगांच्या श्रींची पालखी प्रतिमा भक्तीमय वातावरणात पंढरपूरकडे मार्गस्थ झाली आहे .श्रींचा नामघोष करीत अभंगाच्या तालावर ठेका धरून भाविक पालखी तल्लीन झाले होते. पालखीचे हे 55 वर्ष असून 17 जुलै रोजी आषाढी एकादशी सोळा आटपून पालखीचा परतीचा प्रवास राहणार आहे. श्री क्षेत्र पंढरपूर येथे विठोबाच्या दर्शनासाठी संपूर्ण वारकरी भावीक आषाढी एकादशीच्या सोहळ्यात सहभागी होतात . पंढरपुर पालखीत पायदळवारी करिता पंढरपूरला जाऊ न शकणारे भावी फक्त आषाढी एकादशीला देखील विदर्भ पंढरी असलेल्या शेगांव येथे संत श्री गजानन महाराजांचे दर्शन घेतात.

दरवर्षी पंढरपूरला जाताना श्रींच्या पालखीसोबत हजारो भावीक भक्त नागझरीपर्यंत पायदळ वारी करतात. तसेच पालखीसोबत दोन रुग्णवाहिका, तीन माल ट्रक, तीन अश्व, एक प्रवासी बस व यात वैद्यकीय पथक पाण्याची व्यवस्था करून उपलब्ध करण्यात आली आहे. आज 13 जून रोजी पालखीचे संतनगरी तून प्रस्थान झाले असून १५ जुलै रोजी पालखी विठुरायाच्या पंढरीत पोहोचणार आहे. 17 जुलै आषाढी एकादशी सोहळा नंतर पाच दिवसांच्या मुकाम व पालखी परतीच्या प्रवासाला लागणार आहे. पंढरपूर येथुन 22 दिवसाचा पायदळ प्रवास करीत 11 ऑगस्ट रोजी पालखी संत नगरीत पोहचणार आहे.

Protected Content