यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल तालुक्यातील थोरगव्हाण येथील जिल्हा परिषदच्या प्राथमिक शाळेत पावसाळ्यात उदभविणाऱ्या आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी आरोग्य उपकेद्र अंतर्गत हिवताप निर्मुलन व डेग्यू प्रतिरोधक जनजागृती सभा घेऊन मार्गदर्शन करण्यात आले. यावल तालुका पर्यवेक्षक विजय नेमाडे थोरगव्हाण आरोग्य उपकेद्राच्या सी. एच.ओ.डाँ सय्यद गजाला नदीम यांचा मार्गदर्शनाखाली हिवताप जनजागृती ची मोहिम राबविण्यात येत आहे.
जलद ताप सर्वेक्षण करणे,पाण्यात गप्पी मासे सोडणे,व्हेंट पाइपला जाळी लावणे,आठवड्यातून एकदा कोरडा दिवस पाळणे,पाण्याच्या टाकीवर झाकणे लावावी, खड्ड्यातील पाणी वाहते करणे, कंटनेर सर्वेक्षण पाहणी, सतत हात स्वच्छ पाण्याने धुणे आदींबाबत गाव परिसर व शाळेत जनजागृती केली जात आहे. हात धुण्याच्या पद्धती घरोघरी जाऊन शिकवण्याचे काम आरोग्य शिक्षणा च्या माध्यमातून आरोग्य विभागातर्फे केले जात आहे. आपल्या घरातील डास उत्पत्तीस्थान शोधण्यासाठी नागरिकांनी आपल्या घरी येणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना सहकार्य करण्याचे आवाहन आरोग्य विभागातुन करण्यात आले आहे. याकामी जि.प.शाळेतील मुख्यध्यापक महेद्र देवरे,उपशिक्षक निलेश पाटील, एकनाथ सावकारे,निलेश पाटील, आरोग्य सेवक मकरंद निकुंभ,आशा स्वंयमसेविका निर्जलाबाई सोनवणे ,बेबाबाई न्हावी यांनी सहकार्य केले