जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्र राज्य विक्री व वैद्यकीय प्रतिनिधी संघटनेच्या वतीने शुक्रवारी १६ फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजता राज्य संघटना आणि संयुक्त कामगार कृती समितीच्या वतीने दिलेले हाकेनुसार कामगार विरोधी धोरणाच्या निषेधार्थ व विविध मागण्यांसाठी राज्य व केंद्र सरकारच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर १ दिवसीय संप पुकाररून जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी राज्य शासन आणि केंद्र शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
या संदर्भात माहिती अशी की राज्यभरात महाराष्ट्र राज्य विक्री राज्य संघटना आणि संयुक्त कामगार कृती समितीच्या वतीने कामगार विरोधी धोरणाच्या निषेधार्थ आज देशव्यापी संप पुकारण्यात आले आहे. या अनुषंगाने जळगाव जिल्ह्यातील महाराष्ट्र राज्य विक्री व वैद्यकीय प्रतिनिधी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शुक्रवारी १६ फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजता जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने करण्यात आले. यामध्ये विविध मागण्या करण्यात आले. यात सेल्स टारगेटच्या नावाखाली वैद्यकीय प्रतिनिधींचा छळ, पिळवणूक व बळी घेणे बंद करावे, जीपीएसच्या नावाखाली पाळत न ठेवण्याचा आदेश कंपनी औषधी कंपन्यांना द्यावा, वैद्यकीय प्रतिनिधींच्या सर्वसाधारण कामकाजाचे संवैधानिक नियम तयार करावा, चार श्रम संहिता रद्द करावा, गोपनीयता व खाजगीपणाची जपणूक करावी , प्रति महिना किमान वेतन २६ हजार रुपये मिळावे आणि पेन्शन १० हजार रुपये मिळावे अशा प्रलंबित विविध मागण्या यावेळी करण्यात आले आहे.
याप्रसंगी वैद्यकीय प्रतिनिधींचे राज्याध्यक्ष नरेंद्र सिंह पाटील, रितेश शहा, संदीप पाटील, चेतन पाटील, चंपालाल पाटील, अजहर शेख, सागर घटक, अमोल कुलकर्णी, दिनेश शिंपी, विशाल चौधरी, मनीष चौधरी, किरण पवार, महेश चौधरी, गिरीश नारखेडे, विजय चौधरी, राजेश पोतदार, हर्षल पाटील यांच्यासह वैद्यकीय प्रतिनिधी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.