जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | सफाई कर्मचाऱ्यांचे थकीत पगार तातडीने देण्यात यावे, या मागणीसाठी अखिल भारतीय सफाई मजदुर संघाच्या वतीने आज बुधवार, दि. २८ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता जळगाव महापालिकेसमोर निदर्शने करण्यात आले. थकीत पगार न मिळाल्यास सर्व सफाई कर्मचाऱ्यांना काम बंद करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
याबाबत अधिक असे की, “जळगाव महापालिकेत गेल्या महिन्याचा पगार अद्याप सफाई कर्मचाऱ्यांना देण्यात आलेला नाही. सप्टेंबर महिना देखील संपण्याच्या मार्गावर आहे. काही दिवसांनी दसरा व दिवाळी आहे. या सण साजरा करण्यासाठी सफाई कर्मचाऱ्यांना अर्थीक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने सफाई कर्मचाऱ्यांचे थकीत पगार अदा करावे अशी मागणी अखिल भारतीय सफाई मजदुर संघाचे जिल्हाध्यक्ष अजय घेंगट यांच्यासह सफाई कर्मचाऱ्यांनी आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांच्याकडे केली आहे.
आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी येत्या दोन दिवसांत सर्व सफाई कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन देण्याचे आश्वासन दिले आहे. दरम्यान, दोन दिवसात थकीन वेतन न मिळाल्यास अखिल भारतीय सफाई मजदुर संघाच्या वतीने सफाई कर्मचारी काम बंद आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी अखिल भारतीय सफाई मजदुर संघाच्या वतीने जळगाव महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीसमोर निदर्शने करण्यात आली.