रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | रावेर तालुक्यातील लोकशाही दिनाचे आयोजन २३ डिसेंबर रोजी करण्यात आले आहे. ग्रामीण भागात मंडळ अधिकारी आणि शहरी भागात तहसील कार्यालयात या दिनाचे आयोजन होणार असून जनतेने मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन तहसिलदार बंडू कापसे यांनी केले आहे.
हे आयोजन केंद्र सरकारच्या Good Governance Week – प्रशासन गाव की ओर मोहिमे अंतर्गत करण्यात येत असून संजय गांधी निराधार सह विविध शासकीय योजनांच्या शिबिरांचे आयोजन देखील गाव पातळी व तालुकास्तरावर करण्यात आले आहे.
तालुकास्तर लोकशाही दिनासाठी विविध विभागांचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत, ज्यात गटविकास अधिकारी, न.पा. रावेर आणि सावदा, सा.बां. विभाग, वैद्यकीय अधिकारी, कृषि अधिकारी, भारत संचार निगम लि., महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, पाटबंधारे विभाग आणि होमगार्ड कार्यालयाचे अधिकारी यांचा समावेश आहे.