रेल्वे गाडीच्या वेळा पूर्ववत करा रावेर बऱ्हाणपूरच्या प्रवाशांची मागणी

रावेर प्रतिनिधी । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेल्या भुसावळ-इटारसी पॅसेंजर गाडीऐवजी सोमवारपासून रेल्वे विभागाने मेमू गाड्या सुरु केल्या आहेत. मात्र इटारसीवरून भुसावळ येणाऱ्या गाडीची वेळ चुकीची असल्याने याचा फारसा फायदा खंडवा ते भुसावळ अपडाऊन करणाऱ्या प्रवाशांना होत नाही त्यामुळे पूर्वीच्या पॅसेंजरच्या वेळेवर हि गाडी सोडावी अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.

 

भुसावळ रेल्वे विभागातील भुसावळ- बडनेरा, भुसावळ- देवळाली , भुसावळ- इटारसी आणि भुसावळ-सुरत या पॅसेंजर या गाड्या बंद करण्यात आल्या होत्या. या गाड्या पुन्हा पूर्ववत सुरु कराव्यात अशी मागणी प्रवाशांनी केली आहे. याबाबत सोमवारपासून भुसावळ- इटारसी व भुसावळ-बडनेरा या पॅसेंजर गाड्याऐवजी मेमू गाड्या सुरु करीत प्रवाशांना दिलासा दिला आहे.
बऱ्हाणपूर तसेच रावेर तालुक्यातील रावेर सावदा, निंभोरा येथून भुसावळ, जळगाव येथे नोकरी, व्यवसाय व इतर कामांसाठी दररोज अपडाऊन करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. तसेच याच भागातून शिक्षणासाठी दररोज शेकडो विद्यार्थी भुसावळ व जळगावला जातात. त्यांना सकाळी भुसावलकडे जाणारी गाडी सोयीची होती. मात्र रेल्वेने सुरु केलेली इटारसी- भुसावळ गाडीची वेळ बदलल्याने या गाडीचा या प्रवाशांना कोणताही फायदा होणार नसल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे.  या गाडीची वेळ पूर्वीचीच ठेवावी अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.

Protected Content