Home Cities चाळीसगाव निलेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

निलेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

0
30

चाळीसगाव प्रतिनिधी । खासदार निलेश राणे यांनी जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्राचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्याबद्दल अपशब्द वापरून त्यांचा अवमान करण्याचा प्रयत्न केला. या घटनेच्या निषेधार्थ चाळीसगाव तालुका शिवसेनेतर्फे निलेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशा मागणीचे निवेदन पोलीस निरीक्षक के. के. पाटील यांना देण्यात आले.

यावेळी निलेश राणे याचे विरोधात शिवसैनिकांनी प्रचंड संताप व्यक्त करीत निषेधाच्या घोषणा दिल्या. सदर प्रसंगी शिवसेनेचे जिल्हा समन्वयक महेंद्र पाटील, तालुकाप्रमुख रमेश चव्हाण, शहर प्रमुख नाना कुमावत, तालुका प्रवक्ता दिलीप घोरपडे, धर्मा काळे, सुनील गायकवाड, वसीम चेअरमन संजय ठाकरे, निलेश गायके, मिर्झा भाई, संजय पाटील, रवींद्र चौधरी, शैलेंद्र सातपुते, रामेश्वर चौधरी, विलास भोई, अनिल राठोड, आप्पा देवरे, जयेंद्र पाटील, दिलीप पाटील, राजेंद्र शिंदे, महिला आघाडीच्या प्रतिभा पवार, सुनंदा काटे, नकुल पाटील, सागर पाटील, हेमंत पाटील, अशोक सानप जितेंद्र बोंदार्डे, रॉकी धामणे, धना रावते आदी उपस्थित होते.


Protected Content

Play sound