मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील नायगाव येथील ग्रामपंचायतीत सरपंच आणि उपसरंपच यांच्यावर ग्रामपंचायत सदस्यांनी अविश्वासाचा ठराव मंजूर करून तहसीलदार यांच्या उपस्थितीत सभा घेवून मतदानाद्वारे अविश्वासाचा ठराव मंजूर करून दोघांना अपात्र केले होते. ग्रामपंचायतीचे सरपंच व उपसरपंच पद हे गेल्या अडीच महिन्यांपासून रिक्त असल्याने निवडणूक घेवून रिक्त पदे भरण्यात यावी अश्या सुचना असतांना स्थानिक प्रशासन याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे प्रशासनाने निवडणूक घेवून सरपंच व उपसरपंच पदासाठी तातडीने निवडणूक घेण्यात यावी अशी मागणी तक्रारदार प्रमोद भालेराव यांनी केले आहे.
याबाबत अधिक असे की, मुक्ताईनगर तालुक्यातील नायगांव येथे ग्रुप ग्रामपंचायत नायगांव मधील १) सुपडाबाई रघुनाथ भालेराव २) विशाल पंडित पोहेकर ३) गोपाल कृष्णा न्हावी ४) ललिता संजय कोळी ५)प्रमिलाबाई मनोहर पाटील ६) भगवान चुडामन भील व ७) पुताबाई लक्ष्मण भील या ९ पैकी ७ सदस्यांनी सरपंच १)मोनाली किशोर महाजन व उपसरपंच २)महेश दत्तू पाटील या दोघांवर १६ एप्रिल २०२४ रोजी मुक्ताईनगर तहसीलदार यांच्या कडे अविश्वास दाखल केला होता त्या अविश्वासाची सुनावणी व मतदान घेणे कामीतहसीलदार यांनी दिनांक २३ एप्रिल २०२४ रोजी नायगांव येथे सभा बोलावून संविधानिक पद्धतीने ९ पैकी ७ सदस्यांनी बहुमत सिद्ध करून अविश्वास पारित केलेला असून सरपंच व उपसरपंच पद रिक्त आहे त्याबाबत दिनांक २ मे २०२४ रोजी जिल्हाधिकारी व ३ मे २०२४ रोजी प्रांताधिकारी सो. भुसावळ यांच्या कार्यालयात सरपंच व उपसरपंच पद रिक्त असून सरपंच निवडणूक घेण्यात यावी असा अहवाल पाठविण्यात आलेला आहे. तसेच सदर विषयात मा.जिल्हाधिकारी व मा.न्यायालयाने कुठलेही स्थगिती आदेश दिलेला नसल्याचे पत्र गट विकास अधिकारी यांच्या मार्फत दिलेला असून आज पर्यंत सरपंच निवडणूक घेतली नाही. चुकीच्या पद्धतीने प्रकरणास दिशा दिल्याचे प्रमोद भालेराव यांनी निवेदनात म्हटले आहे
तसेच तहसीलदार कार्यालय मुक्ताईनगर, उपविभागीय अधिकारी कार्यालय भुसावळ व जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयातील अधिकारी या प्रकरणात कुठलीही मातीही देण्यास टाळाटाळ करतात तसेच उडवाउडवीची उत्तरे देतात व निव्वळ वेळकाढू पणा करत असल्याचा आरोप प्रमोद भालेराव यांनी केला आहे तसेच सरपंच व उपसरपंच यांच्यावर अविश्वास पारित झाल्यावर १ महिन्याच्या आत सरपंच निवडणूक घ्यावी लागते परंतु या प्रकरणात तसे काहीही झाले नसून आज २ ते अडीच महिने उलटले असून सरपंच निवडणुकी संदर्भात कुठलाही निर्णय मिळाला नसून सदर प्रकरणी येत्या आठवडे भरात संविधानिक पद्धतीने सरपंच निवडणूक घेवून १) सुपडाबाई रघुनाथ भालेराव २) विशाल पंडित पोहेकर ३) गोपाल कृष्णा न्हावी ४) ललिता संजय कोळी ५)प्रमिलाबाई मनोहर पाटील ६) भगवान चुडामन भील व ७) पुताबाई लक्ष्मण भील या सर्व ग्रामपंचायत सदस्यांना न्याय देण्यात मिळावा अशी तक्रार केली असून आठवडे भारत निर्णय न दिल्यास बेमुदत उपोषण करण्याचे सांगितले आहे.