पारोळा लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघाच्या माध्यमातून सभेमध्ये दिलेल्या सूचनेप्रमाणे आमदार चिमणराव पाटील यांना निवेदन देण्यात आले. आमदार चिमणराव पाटील एरंडोल पारोळा मतदार संघ यांची पारोळा येथे निवासस्थानी भेट घेण्यात आली. जुन्या पेन्शन संदर्भात चर्चा करण्यात आली.
पेन्शन सम्यक समितीचा अहवाल शासनास प्राप्त झाला असून सदर कॅबिनेट मंत्र्यांच्या अधिकारात हा निर्णय होऊ शकतो.तसेच यासंदर्भात मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे साहेब यांच्याशी देखील बोलणार असून पेन्शन विषय मार्गी लावण्याचा प्रयत्न करण्याची चर्चा करून प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन आमदार चिमणराव पाटील यांनी दिले आहे. यावेळी पेन्शन समितीचे पदाधिकारी जिल्हा जुनी पेन्शन संघटनेचे अध्यक्ष डॉ. शांताराम पाटील, सहसचिव गोरख सूर्यवंशी यांच्यासह जळगांव जिल्हा शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे तालुकाध्यक्ष सचिन पाटील, जितेंद्र चौधरी जिल्हाअध्यक्ष बीजेपी शिक्षक संघटना जळगांव, कमलेश देवरे सचिव मुख्याध्यापक संघ पारोळा तालुका, विजय बडगुजर, दीपक भावसार, विश्वास वाघ, एस.एस. भावसार, एन. डी. पाटील, अशोक पाटील कार्याध्यक्ष पारोळा तालुका शिक्षकेतर, दिलीप महाजन उपाध्यक्ष पारोळा तालुका शिक्षकेतर, उमाकांत बाविस्कर, किशोर खैरनार, भागवत सोनवणे, सी.एम. पाटील, अशोक महाले, एन.एस. मराठे, यू.बी. पाटील, एस.आर. पाटील, विजय पाटील व एरंडोल पारोळा तालुक्यातील बहुसंख्येने शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.