चाळीसगाव(प्रतिनिधी) मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान महिना सुरू झालेला आहे. रमजानच्या निमित्ताने मुस्लिम बहुल क्षेत्रातील समस्या प्रशासनाने निकाली काढाव्या, अशी मागणी सत्यविजय फाउंडेशनतर्फे करण्यात आली आहे.
यासंदर्भात चाळीसगाव उपविभागीय अधिकारी, चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन पी.आय. तसेच वाहतूक नियंत्रक शाखा, मुख्याधिकारी न.पा.चाळीसगाव व कार्यकारी अभियंता म.रा.वि.वि. कंपनी यांना सत्यविजय फाउंडेशनचे अध्यक्ष तनवीर शेख यांनी निवेदन दिले आहे. रमजान महिन्यात पिण्याच्या पाणी समस्येचा सामना करावा लागू नये, गल्लीबोळात व मुख्य रस्त्यावर पथदिवे सुरू राहावे, रस्त्यासोबतच दुकान, हॉटेल, मस्जिदीजवळ स्वच्छतेची काळजी घ्यावी, शहरातील घाट रोड व नागद रोड येथील प्रतिष्ठाने, दुकाने, हॉटेल रात्री थोड्या उशिरापर्यंत चालू ठेवण्याची मुभा द्यावी, घाट रोड जामा मस्जिद याठिकाणी संध्याकाळी ४.३० वाजेपासून तर रात्री १०.०० वाजेपर्यंत रोडवर गर्दी असल्याने जड वाहनांना या परिसरात वाहतूक बंदी करून या ठिकाणी दोन वाहतूक पोलिस तैनात करावे, तसेच विद्युत विभागाद्वारे विद्युत पुरवठा नियमितपणे करण्यात यावा, अशा मागण्या या निवेदनातून करण्यात आल्या आहेत.