जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । खोटे नगरपरिसरातील विवाहितेला प्लॉट घेण्यासाठी माहेरहून ५० लाख रुपये आणण्याची मागणी करत शिवीगाळ व मारहाण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पतीसह सासरच्या मंडळींनी विरोधात बुधवारी ५ जून रोजी दुपारी ४ वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव शहरातील खोटे नगर परिसरातील आराधना आपारमेंट येथील माहेर असलेल्या रूपाली विशाल मैराळे (वय 38) यांचा विवाह २०११ मध्ये पनवेल येथील विशाल रमेश मैराळे यांच्याशी झाला. लग्नाच्या सुरुवातीचे दिवस चांगले गेले, त्यानंतर विवाहितेला प्लॉट घेण्यासाठी बाहेरून ५० लाख रुपये आणावे, अशी मागणी केली. दरम्यान विवाहितेने पैसे आणले नाही म्हणून याचा राग धरून पती विशाल मैराळे याने विवाहितेला शिवीगाळ व मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर सासू, सासरे व इतरांनी विविध विवाहितेच्या अंगावरील दागिने काढून घेतले तसेच दमदाटी करून शारीरिक व मानसिक त्रास दिला. हा छळ सहन न झाल्याने विवाहिता जळगावी माहेरी निघून आल्या. याप्रकरणी बुधवारी ५ जुलै रोजी दुपारी ४ वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून पती विशाल रमेश मैराळे, सासरे रमेश उत्तम मैराळे, सासू उषा रमेश मैराळे, ननंद राजेश्वरी प्रशांत भंडारे, विशाखा राहुल गायकवाड सर्व रा.पनवेल मुंबई यांच्या विरोधात जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेबाबत पुढील तपास पोलीस नाईक रामकृष्ण इंगळे करीत आहे.