कासोदा (प्रतिनिधी) येथुन जवळच असलेल्या फरकांडे गावाकडे जाण्यासाठीचा रस्ता भवानी माता मंदिर ते फरकांडे गावापर्यंत अवघा तीन किलोमीटर असून त्यावर ठिकठिकाणी मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. या रस्त्याची प्रचंड दुरावस्था झाल्यामुळे खड्डे चुकविण्याच्या नादात छोटे मोठे अपघात या रस्त्यावर नेहमीच घडत असतात.
लोकसभा निवडणूक आचारसंहिता सुरु होण्यापूर्वी या रस्त्याचे तीन किलोमीटरपर्यंत डांबरीकरण करण्याचे टेंडर लवकरच निघणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम अधिकाऱ्यांनी सांगितले होते. रस्त्याचे मोजमाप व सर्व्हेक्षणही करण्यात आले होते. याच रस्त्यावरील जानफळ या आदिवासी वस्तीसाठी २०० मीटर व फरकांडे ते भवानी मंदिर तीन किलोमीटर रस्त्याचे डांबरीकरण करण्यासाठीची निविदा लवकरच निघणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले होते. मात्र या रस्त्याच्या कामात दिरंगाई होत असल्याने काम लवकर सुरू करण्याची मागणी ग्रामस्थांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे. याबाबत प्रशासन काय भूमिका घेते ? यांच्याकडे सर्वांचे लक्ष लागुन आहे.