यावल ( प्रतिनिधी) तालुक्यातील कोरपावली ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीच्या अनागोंदी कारभारवर वचक बसवण्यासाठी तत्काळ प्रशासकाची नेमणुक करावी, अशा मागणीचे तक्रार निवेदन यावलचे तहसीलदार व प्रभारी गटविकास आधिकारी यांना दिले आहे.
या संदर्भात सुमारे ५०० ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोरपावली गावातील ग्राम पंचायतीच्या नियोजन शुन्य कारभारामुळे ग्रामस्थ त्रस्त झाले असुन मागील दोन वर्षांपासुन सर्वच नागरी सुविधा पुरवण्यात ग्रामपंचायत अकार्यक्षम झाली आहे. गावात संपुर्ण वस्तीला पिण्याचे पाणी पुरेश प्रमाणात मिळेल, अशी परिस्थिती असतांनाही ग्राम पंचायत सदस्यांच्या राजकीय गोंधळामुळे गावातील नागरिकांना आठ ते १० दिवसांआड पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे. तसेच ग्रामपंचायतची मासिक सभा होत नाही, झाली तरी ग्रामपंचायत सदस्य सहभागी होत नाहीत. नागरी समस्या सोडविण्यात ग्रामसेवक आणी ग्राम पंचायत सदस्य निष्क्रीय ठरत असल्याने संपूर्ण गावात गटारी अस्वच्छ, पाणी पुरवठयाचे नियोजन नसल्याने गावातील नवीन वस्तीत २४ तास पाणीपुरवठा होत असुन, गावातील वस्तीत १० दिवसांनी पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येत असतो. या सर्व प्रकारांनी ग्रामस्थ कमालीचे त्रस्त झाले आहेत. प्रभारी सरपंचांनी २५ लाखांची विकासकामे केली असल्याचे वृत्तपत्रात प्रसिध्द झाले आहे, त्यांच्या या विकास कामांचीही चौकशी करण्यात यावी, अशी देखील मागणी करण्यात आली आहे., कोरपावली ग्रामपंचायत सदस्य व ग्रामसेवक हे नागरी सुविधा देण्यात सक्षम नसतील तर ग्रामपंचायत बरखास्त करून प्रशासकाची नेमणुक करावी, अशी मागणीही ग्रामस्थांनी या निवेदनातून केली आहे.
तहसीलदार जितेन्द कुंवर, पंचायत समितीचे प्रभारी गट विकास आधिकारी किशोर सपकाळे यांना दिलेल्या निवेदनावर मुक्तार पिरन पटेल, रशीद बुऱ्हान तडवी, संदीप सिताराम जावळे, ललीत देविदास महाजन, मुबारक सलीम पटेल, बाळु नथ्थु चौधरी, मधुकर गिरधर जावळे, राजेन्द्र छगन फेगडे, सुकदेव तुळशीराम इंधाटे, राजेन्द्र श्रीधर महाजन, विनोद अङकमोल, उमेश फेगडे, प्रफुल्ल नारायण नेहते, केतन बारकु माळी, तबस्सुम कय्युम पटेल, स्वाती नरेन्द्र पाटील, लिना तुषार नेह्ते, अर्चना नेहते, मीनल हर्षल नेहते, कल्पना प्रमोद नेहते, गायत्री ललीत नेहते, समीना रशीद पिंजारी,सरला चंद्रकात जावळे, सविता संदीप जावळे, पुष्पा गिरधर जावळे यांच्यासह सुमारे ५०० ग्रामस्थांची स्वाक्षरी आहे.