यावल – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । शहराला ११ दिवसाआड होत असलेला अशुद्ध पाणीपुरवठा बंद करून शहरवासीयांना दररोज शुद्ध पाणीपुरवठा करावा, या मागणीसाठी तालुक्यातील दुसखेडा गावातील असंख्य महिलांनी यावल पंचायत समिती कार्यालयात धडकल्यानंतर मोर्चेकऱ्यांनी गटविकास अधिकारी तथा तहसीलदार यांना तक्रारीचे निवेदन दिले.
ऐन उन्हाळ्यात तालुक्यातील दुसखेडा गावात ग्रामपंचायतच्या गोंधळलेल्या नियोजना अभावी व दुर्लक्षीत कारभारामुळे पिण्याच्या पाण्याची मोठी गैरसोय निर्माण झाली आहे. या संदर्भात यावल पंचायत समितीच्या प्रभारी गटविकास अधिकारी श्रीमती मंजश्री गायकवाड यांची भेट घेवुन दुसखेडा गावात पिण्याच्या पाण्यासाठी १oते ११ दिवसांची वाट बघावी लागते त्यात ही अशुद्ध पाणी पुरवठा ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात येत असल्याने महीलांची मोठया प्रमाणावर गैरसोय होत असुन , ग्रामसेवक हे महीलांना उडवा उडवी ची उत्तरे देतात तर गावातील पाणी सोडणारा कर्मचारी हा महीलांशी उद्धटपणाची वागणूक देवुन असभ्य भाषेत बोलत असतो , पाणी पुरवठा करणारी पाईपलाईनची ठीकठीकाणी लिक होवुन पाण्याची गळतीचे पाणी हे मोटर बंद झाल्यावर पुन्हा त्या पाईपलाईन मध्ये जाते नंतर तोच अशुद्ध व घाणीचा पाणीपुरवठा गावातील लोकांना केला जातो , या अशुद्ध पिण्याच्या पाण्यामुळे लहान मुलांच्या आरोग्यास धोका निर्माण होत असुन , तात्काळ दुसखेडा ग्राम पंचायत चे ग्रामसेवक यांची तात्काळ बदली करण्यात यावी व गावात पाणीपुरवठा करणाऱ्या कर्मचाऱ्यास समज द्यावी व महीनांना न्याय मिळून द्यावा अशा मागणीचे निवेदन यावल पंचायत समितीच्या प्रभारी गटविकास अधिकारी मंजुश्री गायकवाड यांना दिले.
या निवेदनावर हिराबाई विठ्ठल तायडे, निशा नितिन तायडे , सपना विजय महाले , सुनंदा रमेश कोळी, सुनिता सोनवणे ,कविता कोळी , भारती कोळी , दिपाली राजपुत , पुजा सुनिल गोसावी , पदमाबाई सुतार , देवकाबाई मोढाळे , शोभा ठाकरे , भारती कोळी , वासंती सोनबणे , ज्योती कोळी यांच्यासह असंख्य महीलांच्या स्वाक्षरी आहे.