यावल येथील आयशा नगरातील तरुणांची समस्या सोडवण्याची मागणी (व्हिडिओ )

WhatsApp Image 2019 08 01 at 9.39.53 PM

यावल, प्रतिनिधी | येथील नगर परिषदच्या विस्तारीत भागातील परिसरात नागरी सुविधा देण्यास प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने पावसाळ्यात नागरीकांची मोठी गैरसोय होत आहे. या परिसरातील युवकांनी त्यांच्या समस्यांचे निवेदन नगर परिषद चे कार्यालयीन अधिकारी विजय बढे यांना दिले आहे.

 

या निवेदनात म्हटले आहे की, या भागातील अनेक ठीकाणी अद्याप नगर परिषदच्या माध्यमातुन रस्ते डांबरीकरण करण्यात आलेली नसल्याने पावसाळयातील पाण्यामुळे सर्वत्र चिखलमय वातावरण झाले आहे. या चिखलमय रस्त्यांचा त्रास पादचाऱ्यांपासुन वाहनधारकानांही होत आहे. याच भागातील प्रमुख मार्गावर असलेली आयशा मस्जिद जवळच्या नाल्यावरील पुलाची दुरुस्ती व उंची वाढवावी तसेच फातेमा मस्जिद समोरच्या भागात पाऊसाच्या पाण्यामुळे अत्यंत चिखलमय वातावरण बनले असुन त्या ठिकाणी पेव्हरब्लाँक बसविण्यात यावा. आयशा नगरच्या अनेक भागांमध्ये गटारी बांधकाम झाले नसल्याने गटारी या घाणीच्या आणि पावसाच्या पाण्यामुळे तुबंल्याने दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यावर येत आहे. वाहनधारकांना वाहने चालवितांना व पादचाऱ्यांना पायदळी चालतांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. तरी यावल नगर परिषद प्रशासनाने या विस्तारीत कार्यक्षेत्रातील नागरी समस्यांचे निराकरण करावे अशा मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर अशपाक शाह गफ्फार शाह, आसिफ शेख सईद, अरबाज खान असलम खान, जावेद जमील खान, अदनान आरीफ खान, मुक्तारोद्दीन सैफोद्दीन, जुनेद शेख ईसामु,ईमरान हसन खान यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Protected Content