Home धर्म-समाज यशोदा नगरातील रस्ते दुरुस्त करण्याची मागणी (व्हिडिओ)

यशोदा नगरातील रस्ते दुरुस्त करण्याची मागणी (व्हिडिओ)

0
37


पाचोरा प्रतिनिधी । यशोदा शहरातील रस्ते अत्यंत दयनीय अवस्था झाली असून नगर पालिका प्रशासनाने याकडे लक्ष देऊन तातडीने रस्ता दुरुस्त करावा, अशी मागणी परिसरातील रहिवाशांनी निवेदनाद्वारे नगरपरिषदेला केली आहे.

निवेदनावर विलास जोशी, चंद्रकांत लाहोटी, नंदलाल बोदडे, भगवान पाटील, विनायक पाटील, प्रकाश पवार, दिपचंद जैन, रविंद्र पाटील, गणेश डेअरीचे संचालक गंगाधर पाटील यांच्या सह्या आहेत. शहरातील सर्वे नं. ५८ / १ अ मधील प्लाॅट क्रं. ५ येथील महाविर हाईट्स या कमर्शियल काॅम्प्लेक्स समोरील जैन स्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली असुन ऐन पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने येणाऱ्या जाणाऱ्यांना असह्य त्रास सहन करावा लागत आहे.  तसेच या रस्त्यालगत नविन बांधकाम सुरू असुन बांधकामासाठी लागणाऱ्या  विटा, खडी, आसारी, वाळु ही ऐन रस्त्यावरच टाकण्यात येत असून यशोदा नगर वासियांच्या समस्यांमध्ये अधिक भर पडत आहे. याबाबत नगरपालिका प्रशासनाने लक्ष देवुन सदर रस्त्याचे काम त्वरीत करुन द्यावे अशा आषयाचे निवेदन यशोदा नगर मधील रहिवाशांनी नगर परिषदेला दिले आहे.

 

 

https://www.facebook.com/508992935887325/videos/253365349627865

 


Protected Content

Play sound