मुक्ताईनगर लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील हरताळे ते चांगदेव मार्गे मानपूर जाणाऱ्या रस्त्याच्या कामासाठी फेरनिविदा काढून नुतनीकरणाचे काम त्वरीत पुर्ण करण्यात यावे या मागणीसाठी शिवसेनेसह चिंचोल ग्रामपंयतीच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन देण्यात आले आहे.
मुक्ताईनगर तालुक्यातील हरताळे ते चांगदेव मार्गे मानपूर या रस्त्याच्या कामासाठी निविदा दीड ते दोन वर्षांपुर्वी काढण्यात आली होती. दरम्यान, ठेकेदारांने हे काम अद्यापही पुर्ण केलेले नाही. त्यामुळे रस्त्याची दुर्दशा झाल्याने या रस्त्यावर अनेक लहानमोठे अपघात होत आहे. त्यामुळे या रस्त्याच्या कामासाठी शासनाकडून फेर निविदा काढण्यात येवून तातडीने कामाला सुरूवात करण्यात यावी. अन्यथा चिंचोल मेहून, चांगदेव गाव आणि परिसरात गावकरी यांच्यासह शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन जळगाव येथील सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन देण्यात आले. याप्रसंगी शिवसेना उपजिल्हा संघटक पंकज कोळी, शिवसेना गटप्रमुख विनोद पाटील यांच्यासह आदी उपस्थित होते.