जळगाव, प्रतिनिधी ।येथील जुना खेडी रस्त्यावरील ज्ञानदेव नगर चौकात विद्युत डी पी पासून पाच फुटावर रस्त्यातच एक विजेचा खांब आहे. या खांबाने चौकाचे असमान दोन भाग केले असून तेथे वाहनचालकांचा गोंधळ उडून छोटे मोठे अपघात नेहमी होत असतात. हा धोकादायक खांब काढण्यात यावा अशी मागणी नागरिक करीत आहेत.
ज्ञानदेव नगर चौकांत विद्युत डिपी लगत पाच फुटांवर चौकाच्या मध्यभागी विद्युत खांब आहे. हा चौक महत्वाचा आहे येथून साठ फुटाचा रस्ता निघून पुढे पन्नास कॉलन्यांना जोडणारा हा अतिशय वर्दळीचा मार्ग आहे. यात रस्त्याच्या मध्यभागी असणारा हा विद्युत खांब वाहनचालकांना अडथळा ठरत आहे. एखाद्या दिवसी मोठा आपघात होण्याची भीती नागरिक व्यक्त करत आहे. यातून नागरिकांचा मोठा उद्रेक होण्याची शक्यता आहे. या विद्युत डी पीला परिसरात विद्युत दाहिनी म्हणून उपहासाने ओळखले जाते. हा विद्युत पोल लवकरात लवकर रस्त्यातुन काढावा अशी मागणी नागरिक करीत आहेत.