तलाठी कार्यालय नियमित सुरु ठेवण्याची मागणी

 

भुसावळ, प्रतिनिधी । येथील जामनेर रोडवरील तलाठी कार्यालय नेहमी बंदच राहत असल्याने नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत असून ते त्वरित नियमित स्वरूपात सुरु ठेवण्यात यावे अशी मागणी शेतकरी संघर्ष संघटनेतर्फे तहसीलदारांना दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली.

शहरात शेती,प्लॉट,घर खरेदी-विक्री चालू असताना तलाठी कार्यालय बंद ठेवण्याच कारण काय? आधीच कोरोना विषाणू च्या संक्रमणामुळे भुसावळ शहर व तालुक्यातील जनता त्रस्त झाली आहे. शासनाच्या विविध योजनांसाठी जमीन शेती, घर खरेदी विक्री साठी, विद्यार्थी , लाभार्थी, शेतकरी, विधवा, महिला निराधार आदींना शासकीय कामांसाठी आवश्यक विविध शासकीय दाखले, कागद पत्रके , तलाठी यांचे कडून मिळणे अत्यन्त आवश्यक व गरजेचे असते. तात्काळ भुसावळ शहर व परिसरातील सर्व तलाठी कार्यालय सुरु करावेत. भुसावळ जामनेर रोडचे तलाठी हरवले असून ते कोणालाही दिसत नाही. कार्यालय सतत बंद असल्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत.

सर्व तलाठी कार्यालय नागरिकांचे गैरसोय होऊ नये त्यांचे हित व्हावे यासाठी सुरु करावे. व त्याठिकाणी संबंधित तलाठी यांना कायम हजर राहण्याची सूचना आदेश द्यावा ही विनंती करण्यात अली. याप्रसंगी शेतकरी संघर्ष संघटना ,भुसावळ शहराध्यक्ष देवेंद्र वराडे, शहर उपाध्यक्ष संजय नेहते, शहर सचिव सचिन जगताप, तालुका उपाध्यक्ष दीपक पाटील ,तालुकाध्यक्ष कमलेश बऱ्हाटे, युवा शहर उपाध्यक्ष चेतन कपिले, वारकरी आघाडी शहराध्य भुषण वराडे,, तालुका कार्याध्यक्ष भिकाजी बाणाईत आदी उपस्थित होते.

दरम्यान, शेतकरी संघर्ष संघटनेचे शिष्टमंडळ हे तहसीलदारांकडे असतांना तहसीलदारांनी भ्रमणध्वनीवरून संबंधित तलाठी सोबत संभाषण करून त्वरित तलाठी कार्यालय उघडण्याचे आदेश दिलेत.

Protected Content