जि. प. एन. एच. एम. विभागातील लेखा व्यवस्थापकास पुन्हा नियुक्ती देण्याची मागणी

WhatsApp Image 2019 04 29 at 8.14.49 PM

जळगाव (प्रतिनिधी ) जिल्हा परिषदेतील एन. एच. एम. विभागातील लेखा व्यवस्थापकाची जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या तोंडी आदेशाने नियुक्ती रद्द करण्यात येऊन त्यांच्या दालनास सीलबंद करण्यात आले असून त्यांना पुन्हा नियुक्ती द्यावी अशी मागणी राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अधिकारी, कर्मचारी महासंघाने जिल्हा परिषद अध्यक्ष उज्ज्वला पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

 

निवेदनाचा आशय असा की, मागील १२ वर्षांपासून निलेश पाटील यांची आरोग्य सेवा मुबई आयुक्त यांनी नियुक्ती केली आहे. प्रत्येकवर्षी त्यांचे काम हे उत्कृष्ट होत असल्याने त्यांना प्रत्येकवर्षी पुर्ननियुक्ती देण्यात आली आहे. शासनाच्या निर्देशानुसार प्रामाणिकपणे पाटील हे काम करीत असतांना जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्यात मतभेत निर्माण होऊन त्यांनी व्यक्तीदोषापोटी कोणत्याही नियुक्ती अधिकाऱ्याचा लेखी आदेश नसतांना हेतुपुरःसर कंत्राटी कर्मचाऱ्यावर एकतर्फी अन्याय केला आहे. निलेश पाटील यांना त्यांच्या जागेवरपुन्हा कामकाज करण्याची अनुमती द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
निवेदनावर विजय शिंदे, संजय भावसार, भूषण पाटील, किशोर पाटील, निलेश पाटील, जितेंद्र पाटील, भावना वाणी, माधुरी नेहेते, पौर्णिमा पाटील, नितीन राठोड आदींच्या साह्य आहेत.दरम्यान, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बबिता कमलापूरकर यांच्याशी जिल्हा परिषद अध्यक्ष उज्ज्वला पाटील यांनी भ्रणध्वनीवरून संपर्क साधला असता त्यांनी वरिष्ठांच्या आदेश आले असल्याचे यावेळी अध्यक्ष्यांना सांगितलं. यावर अध्यक्षांनी जोपर्यत निलेश पाटील यांची चौकशी होत नाही तो पर्यंत दोघांनी ही ती कॅबीन वापरू नये असे आदेश दिलेत. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बबिता कमलापूरकर यांच्याकडून अधिक माहिती घेतली असता त्यांनी निलेश पाटील यांच्याकडील फाईल्स वरिष्ठानच्या आदेशाने ताब्यात घेतल्या आहेत. .निलेश पाटील यांनी आर्थिक अनियमतता करत तीन वैद्यकीय अधिकाऱ्याची आकस बुद्धीने चुकीची वसुली लावली होती. डॉ. प्रकाश पाटील यांच्यावर ५ लाखांची वसुली लावली, याच प्रमाणे इतर दोघा डॉक्टरांकडे चुकीची वसुली लावली असल्याचे आढळले आहे. त्यांची एन.आर.एच.एम. चे अधिकारी चौकशी करून गेले असल्याची माहिती दिली आहे. .

Add Comment

Protected Content