मतदान केंद्रावर निवडणूक आदेश व भत्ता मिळण्याची मागणी

 

sanghatana

जळगाव प्रतिनिधी । मतदान केंद्रावर निवडणूक आदेश व निवडणूक भत्ता मिळण्याची मागणी महाराष्ट्र राज्य गावकामगार पोलीस पाटील संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांना निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनावर जिल्हाध्यक्ष नरेंद्र शिंदे पाटील, कार्याध्यक्ष विलास आबा, भाऊसाहेब पाटिल, दिनेश पाटील, शरद पाटील, बारी दादा, जळगाव तालुकाध्यक्ष जितू आबा, सुरेश न्हाळदे, ज्ञानेश्वर पाटिल, जिल्हा सचिव लांडगे बापू, शारदाताई, बोनलकरताई, जिल्हा उपाध्यक्ष भागवत पाटील, कार्याध्यक्ष, किशोर भदाणे, श्री. लंगरे, विटनेर धुमाळ, जिल्हा सलागर गोपाळ, श्री. झोपे, शेषराव राठोड, वसंत लोखंडे, अनुजा चौधरी, तडवी दादा, ईश्वर पाटील यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

 

निवेदनात म्हटल्याप्रमाणे, निवडणूक शांततेत पार पाडण्यात महत्त्वाचा घटक असणाऱ्या पोलिस पाटलाच मतदान केंद्रावर काही ठिकाणी नेमणुका भत्ता नसल्यामुळे निवडणूक व त्यापासून वंचित राहावे लागते. आचारसंहिता लागू झाल्यापासून ते निवडणूक प्रक्रिया पारपडेपर्यंत वरिष्ठांच्या तोंडी आदेशानुसार पोलीस पाटील 24 तास सतर्क राहून वरिष्ठांना माहिती भरून निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था ही भूमिका पार पाडत असतात. परंतु काही ठिकाणी पोलीस पाटलांना लेखी आदेश नसल्याने अधिकृत निवडणूक कर्मचारी नसल्याने त्यापासून वंचित राहतात तसेच राजकीय पुढारी आक्षेप घेण्याचे प्रकार झालेले आहे. तरी लोकसभा निवडणूक आणि विधानसभा निवडणूक प्रक्रियेत जिल्ह्यातील सर्व पोलिस पाटलांना लेखी नेमणूक आदेश व निवडणूक प्रथम मिळण्याची तजवीज करण्यात यावी, अशी मागणी जळगाव जिल्हा गावकामगार पोलीस पाटील संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले.

Add Comment

Protected Content