खामगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | रहदारीच्या मुख्य रस्त्याच्या मोठ्या नालीवरील स्लॅब ढासळत असल्याने हा प्रकार धोकादायक ठरत आहे. याठिकाणी नालीवर पाईप टाकण्याची मागणी नागरिकांकडून प्रशासक नगर परिषद खामगाव यांच्याकडे निवेदनाव्दारे करण्यात आली आहे.
दि. 11 फेब्रुवारी रोजी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सिव्हिल लाईन, भिसे प्लॉट भागातील महारुद्र हनुमान मंदिर जवळील रहदारीच्या मुख्य रस्त्यावर मोठी नाली आहे.या नालीवरील स्लॅब कमकुवत झाला असल्याने तो एका बाजूने ढासळला आहे. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन येथे एखादया वेळी वाहनांची धडक होऊन भविष्यात अपघात होण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही.तर एखाद्या वेळी जड वाहन गेल्यास उर्वरित कमकुवत स्लॅब सुद्धा ढासळन्याची भीती निर्माण झाली आहे. करिता नालीवर पाईप टाकल्यास वाहतुकदारांना तसेच नागरिकांना ते सोयीचे होईल.करिता नागरिकांच्या या मागणीचा गांभीर्याने विचार करून पाईप टाकण्याची मागणी करण्यात आली आहे.
निवेदनावर श्रीकांत भुसारी, विजय पवार,सुभाष देशमुख,दिनेश रोठे,आशिष देशमुख, धनंजय भिसे,राजेश अग्रवाल, मनोज परदेशी, जगनसेठ बसंतवानी, अभय अकोटकर, मल्हार वडवाले, सनी ससाणे, श्याम परदेसी, प्रफुल पाटील,सुरेश नागवानी, संजीत अग्रवाल, कृष्णा चांडक, रोहित पगारिया, भरत तोलंबे, राजू तोंडे, आशुतोष डिडवाणी, मंगेश इंगळे यांचेसह नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.अशी माहिती एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे श्रीकांत भुसारी यांनी दिली आहे.