वसिम रिजवीवर तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी

धामनगाव बढे प्रतिनिधी । उत्तर प्रदेश येथील लखनऊ मधील शिया बोर्डचे अध्यक्ष वसिम रिजवी यांनी सर्वाच्च न्यायलयात मुस्लीम समाजातील पवित्र धर्मग्रंथ “कुरआन शरिफ” यातील २६ आयात बदल केल्याप्रकरणी रिजवीवर तात्काळ गुन्हा दाखल करा, अशी मागणी धा.बढे ग्रा.पं चे सरपंच यांचे पती शेख अलीम कुरेशीसह सदस्यांनी निवेदन देत धा.बढे ठाणेदारास निवेदनाव्दारे केली.

या मागणी केल्यामुळे संपुर्ण मुस्लीम समाजाच्या भावना दुखावल्याने धर्मद्वेषी वसिम रिजवीच्या पुतळ्याचे शहरातील चौकात दहन करून जाहीर निषेध व्यक्त  करण्यात आले , मुस्लीम समाजात अराजकता फैलावण्याचे सह अश्या प्रकारे धर्मद्वेषाचे कटकारस्थान करणाऱ्या वसीम रिजवीच्या विरुध्द तत्काळ गुन्हा दाखल करुन अटक करण्याची मागणी  एका लिखित निवेदनाद्वारे धामणगाव बढे ग्रामपंचायतीच्या सरपंच यांचे पती शेख अलीम कुरेशी, ग्राम पंचायत सदस्य अॕड वसिम कुरेशी, ग्रामपंचायत सदस्य हाफीज सादीक शेख,ग्राम पंचायत सदस्य  तथा पत्रकार रशीद पटेल, ग्राम पंचायत सदस्य जमिर कुरेशी धामणगाव बढेचे ठाणेदार चंद्रकांत ममताबादे यांचे कडे केली आहे.

 

Protected Content