वसिम रिजवीवर तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी

धामणगाव बढे प्रतिनिधी । उत्तर प्रदेश येथील लखनऊ मधील शिया बोर्डचे अध्यक्ष वसिम रिजवी यांनी सर्वाच्च न्यायलयात मुस्लीम समाजातील पवित्र धर्मग्रंथ “कुरआन शरिफ” यातील २६ आयात बदल केल्याप्रकरणी रिजवीवर तात्काळ गुन्हा दाखल करुन कठोर कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र मुस्लीम युवक प्रतिष्ठानतर्फे पोलीसांना निवेदनाव्दारे करण्यात आली आहे.

दरम्यान रिजवी यांने सांगीतले आहे की या आयात मुळे दहशतवादास प्रोत्साहन देण्यात येत असल्याचे म्हटले असुन, अशा प्रकारे कृत करणाऱ्या समाजकंटक वसीम रिजवीचा जाहीर निषेध करून त्याच्या विरुध्द  धामणगाव बढे येथील महाराष्ट्र मुस्लीम युवक प्रतिष्ठाणचे बुलढाणा जिल्हा उपाध्याक्ष आरिफ खान बिबन खान पठाण, सोशल मिडीया शहर अध्यक्ष अलीम शहा, शहर अध्यक्ष सद्दाम कुरेशी, वसिमखान यांनी धामणगाव बढे पोलीस स्टेशनचे ठाणेदार चंद्रकांत ममताबादे यांना वसिम रिजवीवर तात्काळ गुन्हा दाखल करण्यात येवुन कठोर कारवाई करण्याची मागणी एका निवेदनाव्दारे करण्यात आली आहे.

 

Protected Content