क्रीडांगणावर उपविभागीय कार्यालय बांधण्याचा प्रस्ताव रद्द करण्याची मागणी

फैजपूर- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । नगर पालिका संचलित म्युनिसिपल हायस्कूल च्या मागील भागात असलेल्या मधुकरराव चौधरी क्रीडांगणावर उपविभागीय अधिकारी कार्यालय बांधण्याचा प्रस्ताव रद्द करावा या मागणीचे निवेदन आज देण्यात आले.

प्रांताधिकारी उपविभाग फैजपूर व प्रभारी प्रशासक नगर पालिका फैजपूर यांच्याकडे निवेदन देण्यात आले. यात म्हटले आहे की, की नुकतेच येथुन बदली होऊन गेलेल्या प्रभारी उपविभागीय अधिकारी श्रीमती देवयानी यादव मेडम यांनी एक प्रस्ताव पारित केला होता की नगर पालिका संचलित म्युनिसिपल हायस्कूल च्या मागील भागात असलेल्या मधुकरराव चौधरी क्रीडांगणावर उपविभागीय अधिकारी कार्यालय बांधण्यात यावा. मात्र सध्या फैजपूर शहरांचा विस्तार खूप झपाट्याने वाढत आहे म्युनिसिपल हायस्कूल च्या मागील भागात नगर पालिकेच्या वतीने विद्यार्थी व शहरातील युवकांना खेळण्यासाठी मैदान बांधुन दिले या मैदानावर ‘प्ले ग्राउंड’चे आरक्षण असुन सुद्धा हा घाट घातला जात आहे.

या निवेदनात पुढे म्हटले आहे की, फैजपूर शहराचा विस्तार पाहता असेच किंवा यापेक्षा मोठे मैदानाची गरज या शहराला आहे. पण असे न करता याउलट असलेल्या मधुकरराव चौधरी क्रीडांगणावर उपविभागीय अधिकारी कार्यालय बांधण्यात येणार आहेत व खेळाडू व युवकांच्या हक्कांवर गदा आणण्याचा प्रयत्न केला जात आहे तर आपण याकडे जातीने लक्ष द्यावे व हे प्रस्ताव रद्द करण्यात यावे अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.

दरम्यान, या मागणीवर निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही समस्त शहर वासीयांच्या वतीने देण्यात आला. यावेळी माजी नगराध्यक्ष शेख कुरबान, देवा चौधरी, वसीम जनाब, मुदस्सर नज़र, कल्लु भाऊ, मो रियाज, शेख मोहसीन, जफर अली, शेख जावेद आदी उपस्थित होते.

Protected Content