जळगाव (प्रतिनिधी ) भोपाळ मधून भाजपतर्फे लोकसभेची उमेदवार प्रज्ञा सिंग ठाकूर यांची उमेदवारी रद्द करून त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी या मागणीचे निवेदन जळगावकर नागरिकांनी जिल्हाअधिकारी यांच्या मार्फत राष्ट्रपती देण्यात आले. यात मुख्य निवडणूक अधिकारी यांनी प्रज्ञा सिंगची उमेदवारी रद्द करण्याची व त्यांचा जामीन ज्याकारणासाठी देण्यात आला आहे ते कारण आता नसल्याने जामीन सुद्धा रद्द करण्याचे आदेश संबंधीतांना देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, सर्व प्रथम जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व नागरिक जमा झाले. प्रा शेखर सोनाळकर यांनी पार्श्वभूमी स्पष्ट केली. मानियार बिरादारीचे अध्यक्ष व या समितीचे समनव्यक फारूक शेख यांनी निवेदनाचे सामूहिक वाचन केले. यावेळी प्रा. डॉ. सी. पी. लभाणे, प्रा. देवेंद्र इंगळे, फारूक शेख, करीम सालार, वासंती दिघे, वैशाली पाटील, अंजुम रिझवी,रईस बागवान, अश्फाक पिंजारी, सतीश सुर्वे, ऍड इम्रान हुसेन, डॉ. रिझवान खाटीक, ऐनोद्दीन शेख,नईम शेख(लकडावाला), ताहेर शेख, अब्दुल रउफ, मुकेश पाटील, सीताराम देवरे, सुधाकर पाटील, साबीर शाह, दानिश अहेमद, कासीम उमर, फहिम पटेल ,नईम खाटीक, रहीम तडवी, पीयूष तोडकर, सय्यद हारून, आकाश चौधरी, विकास पाटील, फिरोज पिंजारी, मुझ्झामिल शेख, हारून शेख, अन्वर शेख, सलमान खाटीक, मझहर पठाण, रियाझ काकर, कौसर शेख, सुभाष कोळी, शफी पेंटर, मोहम्मद शफी, रफिक मजीद, वसीम शेख आदी उपस्थित होते व त्यांच्या स्वाक्षऱ्या निवेदनावर आहेत.