रावेर (प्रतिनिधी) तालुक्यातील रसलपुर येथील एका युवकाचा डेंग्यू’मुळे मृत्यू झाला असून त्यानंतरही गावात स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या ग्राम पंचायत प्रशासनाविरुद्ध योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणी युवा सेनेतर्फे करण्यात आली आहे.
याबाबत वृत्त असे की, रसलपुर ग्राम पंचायतीच्या गलथान कारभारामुळे व घाणीच्या साम्राज्यामुळे गावात अस्वच्छता पसरलेली आहे. यामुळे डेंग्यूसारख्या जीवघेण्या आजाराने अनेकजण त्रस्त झाले आहेत. गावातील तरुण अशोक प्रकाश विंचुरकर (वय २४) याचा डेंग्यूच्या आजाराने मृत्यू झाल्याचे निदान मुंबईच्या नायर हॉस्पीटलने केले आहे, मात्र ग्राम पंचायत अधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसत आहे. गावात स्वच्छताही करण्यात यावी, अशी मागणीही युवासेनेने केली आहे.