भुसावळ प्रतिनिधी । शहरातील डी.एल.हिंदी शाळेत झालेल्या घटनेचा निषेध व्यक्त करत आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करावी व शाळेच्या आवारात कायमस्वरूपी दोन पोलिस कर्मचाऱ्यांची बंदोबस्तासाठी हजेरी लावावी यासाठी भुसावळ विभागीय अधिकारी तथा प्रांत यांना मागणीचे निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटल्याप्रमाणे भुसावळ शहरात सध्या टवाळखोर व बदमाश वृत्तीचे मुले तोंडाला कपडा किंवा रुमाल बांधून मुली व महिलांची छेडछाड करत अश्लिल चाळे करतात. त्यामुळे टवाळखोर मुलांच्या भीतीने मुली व महिला तसेच शिक्षक वर्गात भीतीवे, दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा टवाळखोर मुलांवर कारवाई करत कायमस्वरूपी बंदोबस्त करावा, तसेच तरुणांच्या गुन्हेगारीकडे वाढता कल बघून वचक बसावा आणि छेडछाड करणाऱ्या टवाळखोर मुलांवर कारवाई करावी. शहरातील डी.एल.हिंदी शाळेत झालेल्या घटनेचा निषेध व्यक्त करत आरोपीवर गुन्हा दाखल करत कारवाई करण्याची मागणीचे निवेदन उमाकांत शर्मा यांच्यासह आदींनी दिले.
निवेदनावर यांच्या आहेत स्वाक्षऱ्या
या निवेदनावर हेमंत खरात, राजन मल्होत्रा, मुकेश गुंजाळ, गौरव आवटे, मनीष वर्मा, रोहित महाले, भूषण महाजन, राहुल पाटील, हितेश टकले, गोपीसिंग राजपूत, मनोज चौधरी, योगेश हरणे, किरण पाटील, पवन बसवे, लोकेश जोशी, अक्षय जाधव, प्रशांत उपासनी, निखिल उपाध्याय, राहुल मुळे, मोहित वाणी, राकेश शर्मा, शंभू वैष्णव आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.