जळगाव (प्रतिनिधी) पाकिस्तानातील सिंध प्रांतात राहणार्या सिंधी आणि अल्पसंख्यांक समाजातील लोकांचे जबरदस्तीने मुस्लिम समाजात धर्मांतरण केले जात आहे. तसेच त्याठिकाणी काही कुप्रवृत्ती लवजिहाद सारखा प्रकार घडवित आहे. या सर्व प्रकाराविरुद्ध भारतीय सिंधू सभेतर्फे जळगावात अपर जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
पाकिस्तानातील सिंध प्रांतात होणार्या धर्मांतराच्या घटनेविरोधात मार्च हिंदुसभेचे नुकतीच एक परिषद घेण्यात आली यामध्ये अशा कारवायांविषयी चर्चा झाली. जळगाव त्याच अनुषंगाने गुरुवारी सिंधी साहित्य अकादमीचे कार्याध्यक्ष ना.डॉ.गुरुमुखजी जगवानी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकार्यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात, सिंध प्रांतात होणाऱ्या तरुणींचे धर्मांतरण रोखण्यासाठी पाकिस्तान व आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने त्याची दखल घ्यावी, पाकिस्तानातील अपसंख्यांक हिंदू समाजाला संरक्षण द्यावे, भारतातही अशा घटनांवर रोख लावावी, धर्मांतरण करण्यास प्रवृत्त करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
निवेदन देताना नगरसेवक राजू अडवाणी, डॉ.मूलचंद उदासी, मनोज आहुजा, रेश्मा काळे, रितू रायसिंघाणिया, रेश्मा बेहरानी, संजय हिरानी, राजेश मेहता, राजेश मलीक, सुशील हसवानी, रमेश मतानी, दयानंद विसरानी, हरिष रायसिंघाणी, सौरभ केसवानी आदींसह अनेक समाजबांधव व नागरिक उपस्थित होते.