संशयिताला अटक; जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । एका भागात राहणारी २४ वर्षीय तरूणीचे आक्षेपार्ह फोटो काढून सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देवून १६ हजार रूपये घेतले. तसेच तिच्या भावी पतीच्या फेसबुकवर फोटो शेअर करून तिची बदनामी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित आरोपीला वाघ नगरातून अटक करण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील एका भागात २४ वर्षीय तरूणी ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. त्याच परिसरात राहणारा संशयित आरोपी प्रफुल्ल सुधाकर सोनवणे उर्फ सुर्यवंशी याने मे २०२३ ते ७ सप्टेंबर दरम्यान तरूणीचे आक्षेपार्ह फोटो मोबाईलमध्ये काढून घेतले. त्यानंतर ही फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. त्यानंतर आईवडीलांना जीवेठार मारण्याची धमकी देत वेळोवळी १६ रूपये मागून घेतले. एवढेच नाही तर तिच्या भावी पतीच्या फेसबुकवर आक्षेपार्ह फोटो टाकून तिची बदनामी केली. हा प्रकार घडल्यानंतर पिडीत मुलीने महिनाभर हा प्रकार कुणाला सांगितला नाही. होणारा त्रास सहन न झाल्याने तिने बुधवारी ४ ऑक्टोबर रोजी रात्री ९ वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार संशयित आरोपी प्रफुल्ल सुधाकर सोनवणे उर्फ सुर्यवंशी याच्या विरोधात जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक महेश शर्मा करीत आहे.