जळगाव प्रतिनिधी । शहरातील एका भागात राहणाऱ्या महिलेचे बनावट फेसबुक इन्स्टाग्रामचे अकाउंट तयार करून त्याद्वारे तिची बदनामी केल्याप्रकरणी जळगाव सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , शहरातील एका भागात ४५ वर्षीय महिला आपल्या कुटुंबासह वास्तव्यास आहे. नोव्हेंबरमध्ये अनोळखी व्यक्तीने महिलेचे बनावट फेसबुक इन्स्टाग्राम चे खाते तयार केले. त्यावरून महिलेच्या ओळखीच्या लोकांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. नोव्हेंबर ते आजपावेतो अशाप्रकारे अनोळखी व्यक्तीने बनावट फेसबुक इन्स्टाग्राम च्या खात्यावरून महिलेच्या नावाचा गैरवापर करीत तिची बदनामी केली. अशी तक्रार महिलेने दिली असून त्यावरून बनावट खाते तयार करणार्या अनोळखी व्यक्तीविरुद्ध जळगाव सायबर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक लीलाधर कानडे करीत आहेत.