जळगाव प्रतिनिधी । शिवाजीनगर बचाव संघर्ष समितीच्या अध्यक्षपदी दिपककुमार गुप्ता यांची एकमताने निवड करण्यात आली. शिवाजीनगर बचाव संघर्ष समितीची 22 मार्च रोजी बैठकीचे आयोजन करण्यात आले असून या बैठकीत समितीची पुढील वाटचालीसाठी चर्चा आणि निर्णय घेण्यात येणार आहे.
गेल्या अनेक महिन्यांपासून शिवाजी नगर रेल्वे उड्डानपुल बांधकामाची प्रशासनाची तयारी होती. आता प्रत्यक्षात नविन पुलांच्या बांधकामास सुरूवातही झाले. मात्र प्रशासनाने ‘टी’ आकाराच्या उड्डाण पुलाला विरोध केला जात असून या पुलाला ‘वाय’ आकाराचा बनवावा अशी मागणी समितीच्या वतीने करण्यात येणार आहे. तसेच शिवाजी नगर रहिवाश्यांची अद्यापर्यंत पर्यायी रस्ता नसल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.