धरणगाव (प्रतिनिधी) राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष तथा माजी उपनगराध्यक्ष दिपक वाघमारे यांनी लोकनियुक्त नगराध्यक्ष पोटनिवडणुकीसाठी आज पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
धरणगाव लोकनियुक्त नगराध्यक्ष पोटनिवडणुकीसाठी निवडणूक प्रक्रिया सुरु झाली आहे. आज राष्ट्रवादीकडून माजी उपनगराध्यक्ष दिपक वाघमारे यांनी अर्ज दाखल केला. यावेळी ज्येष्ठ नेते मोहन पाटील सर , सिताराम मराठे, राजू ओस्तवाल यांच्यासह आदि कार्यकर्ते उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी प्रांताधिकारी गोसावी साहेब तसेच मुख्याधिकारी पवार साहेब यांनी उमेदवारी अर्ज स्वीकारला. दरम्यान, तत्पूर्वी माजी नगरसेवक निलेश चौधरी, हाजी इब्राहीम, संभाजी धनगर यांनी देखील राष्ट्रवादीकडून अर्ज दाखल केलेले आहेत.