जळगाव प्रतिनिधी । माहिती अधिकार कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता यांचे पोलीस संरक्षण कायम ठेवावे या मागणीचे निवेदन जळगाव जिल्हा जागृत जनमंचच्या वतीने मंगळवारी १८ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांना निवेदन देण्यात आले.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, माहिती अधिकार कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता यांनी जळगाव जिल्ह्यातील वाळू व रेशन दुकाना झालेलया अपहाराबाबत माहिती मिळविली होती. जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याकडे तक्रार केल्यानंतर त्याची चौकशी करण्यात आली. त्यात काही तथ्य आढळून आले. त्यानुसार दोषींवर दंड करण्यात आला होतो. दंड झालेले वाळूमाफीया आणि रेशन दुकानदारांना सुडबुध्दीने दीपककुमार गुप्ता यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे. दरम्यान प्रशासनाच्या त्रृटी, अनियमितता माहिती अधिकार कार्यकर्ते शोधून काढतात. त्यानुसार सामाजिक व राजकीय नेते दोषींवर कारवाई करण्याचा आग्रह करतात. सामाजिक कार्यकर्त्यांना समांतर आरटीआय व सामाजिक संघटना काम करीत आहे. परिणामी भ्रष्टाचार करणाऱ्यांकडून दीपककुमार गुप्ता यांची वित्त व जीवित हानी होण्याची शक्यता असल्याने गुप्ता यांचेवरील पोलीस संरक्षण कायम ठेवावे अशी मागणी जळगाव जिल्हा जागृत जनमंचचे जिल्हाध्यक्ष शिवराम पाटील यांनी निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनावर इश्वर मोरे, अनिल नाटेकर, अमोल कोल्हे, निळकंठ पाटील, राकेश वाघ यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.