पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । श्री क्षेत्र पंढरपूर येथील श्री विठ्ठल मंदीराच्या परिसरातील माती आता थेट पारोळा एरंडोल भडगाव मतदार संघातील आपल्या गावातील श्री विठ्ठल मंदीरात तुळशीच्या कुंडी रूपात ठेवण्यात येणार आहे. या अनुषंगाने पंढरपूर येथून माती आणण्यासाठी समर्पण कलश पंढरपूरकडे रवाना झाला आहे. यावेळी आमदार चिमणराव पाटील, जळगांव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष अमोल पाटील यांच्या शुभहस्ते कलशाची विधिवत पूजा करण्यात आली.
या वाक्यानुसार आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरीचे दर्शन आपल्याकडेही व्हावे यासाठी जिल्हा बँकेचे अमोल पाटील यांच्या संकल्पनेवर आधारित एक आगळा वेगळा उपक्रम राबविण्यात येत आहे. श्रीक्षेत्र पंढरपूर येथील श्री विठ्ठल मंदिराच्या परिसरातील माती आता थेट पारोळा-एरंडोल-भडगांव मतदारसंघातील आपल्या गावातील श्री विठ्ठल मंदिरात तुळशीच्या कुंडी रुपात ठेवण्यात येणार आहे. यासाठी पंढरपूर येथून माती आणण्यात येणार आहे. यात वारकरी संप्रदायातील जोडप्यांच्या हातून कलशाद्वारे ही पवित्र माती पूजा अर्चा करून आणण्यात येणार आहे.
यासाठी मतदार संघातील भाविक पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाले. यावेळी आमदार चिमणराव पाटील, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अमोल पाटील यांच्या शुभहस्ते कलशाची विधिवत पूजा करण्यात आली. यासमयी कासोदा येथील ह.भ.प.संजय मराठे (जमादार सर), देवगांव येथील ह.भ.प.भाईदास पाटील व गिरड येथील ह.भ.प.स्वप्निल पाटील हे आपल्या सपत्नीक ही पवित्र माती आणण्यासाठी “श्री” सेवा देत आहेत. प्रसंगी शहरप्रमुख अमृत चौधरी, योगेश पाटील, विलास वाघ, पंकज मराठे, बापु मराठे, कोमल पाटील, मुंदाणे प्र.ऊ.सरपंच एकनाथ पाटील, आडगांव सरपंच महेश मोरे, मा.नगरसेवक राजु कासार, कैलास पाटील, भावडु चौधरी, भिका हटकर, मन्साराम चौधरी, तामसवाडी येथील गोविंद पवार, प्रवराज पाटील, उंदीरखेडे ग्रामपंचायत सदस्य अक्षय निकम, उमेश चौधरी उपस्थिती होती.
रामकृष्ण हरी च जयघोष करीत ही गाडी रवाना झाली. येत्या १७ जुलै रोजी आषाढी एकादशीला गावातील श्री विठ्ठल मंदिरातील तुळशीत समर्पण करण्यात येणार आहे. आपल्या गावातच प्रति श्रीक्षेत्र पंढरपूर या पवित्र मातीचा रुपात समर्पित व्हावे आणि ज्यांना पंढरपुरी विठुरायाचे दर्शन घेणे शक्य होत नाही अशा भाविकांना दर्शन मिळावे तसेच प्रत्येक मातीच्या कणात विठोबा असून आपल्या प्रत्येकाच्या मनात विठुराया राहावा नेहमी देवाचे दर्शन आपल्याला मिळून सानिध्यात आपण राहावे या भावनेने ही संकल्पना राबविण्यात येत असल्याचे अमोल पाटील यांनी सांगितले. सर्व धर्म सर्व पंथ सगळे एक होऊन प्रत्येक भाविकांसाठी हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचेही ते म्हणाले. पंढरपूर वरून माती आल्यानंतर यथोचित पूजा करून या मातीचे वेगवेगळ्या कुंडीत समर्पण केले जाणार असून सर्व भाविकांनी यात सेवाभावी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.