चैतन्य तांडा येथे विकास कामांचे लोकार्पण (व्हिडिओ)

चाळीसगाव, जीवन चव्हाण । तालुक्यातील चैतन्य तांडा येथे स्व. नानाश्री उत्तम चौधरी यांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ नानाश्री नगराचे नामकरण करून विविध विकास कामांचे उद्घाटन आमदार मंगेश चव्हाण यांच्या हस्ते आज शनिवार रोजी सकाळी ११ वाजता करण्यात आले.                

तालुक्यातील चैतन्य तांडा ग्रामपंचायतीने नुकतीच येथील नानाश्री नगर निर्मितीस मंजूरी दिल्याने स्व. नानाश्री उत्तम रामभाऊ चौधरी यांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ नानाश्री नगर फलकाचे अनावरणासह विविध विकासकामांचे उद्घाटन आमदार मंगेश चव्हाण यांच्या हस्ते शनिवार रोजी करण्यात आले. दरम्यान नानाश्री नगरात लोकवर्गणीतून विविध विकासकामे करण्यात आली आहे.

तत्पूर्वी आमदार निलय नाईक यांच्या स्थानिक विकास निधीतून ३ लाखांचा प्यूअर ब्लॉग बसविण्यात आले आहेत. माजी चेअरमन दिनकर राठोड यांच्या प्रयत्नातून ग्रामपंचायतीने एसबीएम अंतर्गत २० कुटुंबाला शौचालय बांधून दिले आहेत. गेल्या दिड वर्षांपासून गजानन चौधरी यांच्या प्रयत्नाने नानाश्री नगरात स्वखर्चाने मुरूम टाकणे, पोलावर विद्युत बल्ब लावणे अशा विविध विकासकामे केली जात आहे.

त्याचबरोबर दिनकर राठोड यांच्यामुळेच हे विकासकामे सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान चांगल्या कामासाठी मी सदैव तुमच्या सोबत असून लवकरच याठिकाणी हायमास्टर बसवून देणार असल्याची ग्वाही आमदार मंगेश चव्हाण यांनी उपस्थितांशी संवाद साधताना केली.

सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी चेअरमन दिनकर राठोड हे उपस्थित होते. यावेळी विविध मान्यवरांच्या हस्ते चैतन्य तांडा ग्रामपंचायतीचे सरपंच अनिता राठोड, उपसरपंच आनंदा राठोड, सदस्य वसंत राठोड, सदस्य प्रवीण चव्हाण, सदस्य अरूणा पवार, सदस्य अनिता चव्हाण, सदस्य यशोदा चव्हाण, सदस्य गिता राठोड व कैलास जाधव यांचे सत्कार करण्यात आले. यावेळी नगरसेवक घृष्णेश्वर पाटील, नगरसेविका विजया पवार, प्रविण मराठे व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

 

https://www.facebook.com/508992935887325/videos/1191286938007433

 

Protected Content