रोटरी वेस्टतर्फे गाडेगाव येथे सिमेंट बंधाऱ्याचे लोकार्पण

जळगाव प्रतिनिधी । रोटरी क्लब ऑफ वेस्ट तर्फे गाडेगाव येथे सिमेंट बंधाऱ्याचे लोकार्पण करण्यात आले. तसेच यावेळी बंधाऱ्यांच्या पुढील जमिनीवर  शिवनाला खोलीकरण करण्यासाठी भूमिपूजन करण्यात आले. 

याप्रसंगी अध्यक्ष तुषार चित्ते, मानद सचिव केकल पटेल , माजी अध्यक्ष संदीप काबरा, उपप्रांतपाल योगेश भोळे, प्रोजेक्ट चेअरमन इंजि. राहुल पवार, संजय इंगळे, दिग्विजय पाटील, व  गाडेगावचे सरपंच मच्छिंद्र सपकाळे, उपसरपंच तुषार पाटील, विजय चौधरी, मारुती भिरुड, आत्माराम पाटील, शिवाजी महाराज पर्यावरण आणि कृषी विकास संस्थेचे सागर धनाड  यांची प्रमुख उपस्थिती होती.

रोटरी क्लब जळगाव वेस्ट व आर .जी. मानुधने फाउंडेशन  मुंबई, यांच्या संयुक्त विद्यमाने हा बंधारा विकसित करण्यात आला आहे. यासाठी 17 लाख रुपये खर्च आला आहे.

या बंधाऱ्यामध्ये पाच कोटी लिटर पाण्याची साठवण होणार आहे. यामुळे 250 एकर शेत जमिनीसाठी याचा फायदा होणार आहे. हा बंधारा मागील तीन वर्षात रोटरी वेस्टने शिव नाला खोलीकरण करून त्यावर बांधण्यात आला आहे. परिसरातील विहिरींची पाण्याची पातळी वाढण्यासाठी तसेच गावातील अडीच हजार लोकवस्तीला याचा फायदा होणार असल्याचे अध्यक्ष तुषार चित्ते यांनी सांगितले.

 

 

Protected Content