धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यात गेल्या पावसाळ्यात समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे खरीप पिकांचा हंगाम पुर्णपणे वाया गेला आहे. त्यामुळे धरणगाव तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात यावा या मागणीचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रसचे नेते तथा माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांनी गुरूवारी ९ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजता धरणगाव तहसीलदारांना देण्यात आले.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जळगाव जिल्ह्यात यंदा पावसाचे प्रमाण होते. त्यातच धरणगाव तालुक्यात पावसाचे पर्जन्यमान सर्वात कमी होत. त्यामुळे खरीप हंगामातील सर्व पिके वाया गेली आहे. तालुक्याची आणेवारी ५० पैशांच्या आत लावावी. तसेच रब्बी हंगामासाठी गिरणा धरणातून दोन आवर्तने सोडविण्यात यावे असे मागणीचे निवेदन गुरूवार ९ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजता राष्ट्रवादीचे नेते तथा पालकमंत्री गुलाबराव देवकर यांनी धरणगाव तहसीलदार यांना देण्यात आले.
याप्रसंगी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष धनराज माळी, दीपक वाघमारे, जेष्ठ नेते मोहननाना, मार्केट कमिटीचे संचालक रवि पाटील, कार्याध्यक्ष अरविंद देवरे, दिलीप धनगर, मनोज पाटिल, वासुदेव सपकाळे, किरण पाटील , भैय्या पाटील, राजु वाणी , उत्तम भदाने, विजय सूर्यवंशी, भूषण पाटील, सदिंप पाटील गोविंदा पाटील, नारायण चौधरी,, विलास ननवरे, भूषण पाटील, आफोज पटेल, विनायक पाटील, शालिग्राम पाटील, ज्ञानेश्वर पाटील, सावकार पाटील, चंद्रकात पाटील, बाळा पाटील, सुरेश महाजन, गोकुळ पाटील, अजय पाटील, शाहिद पटेल, भैय्या पटेल, कपिल पाटील, तुषार चौधरी, किरण पाटील, संजय पाटील , प्रल्हाद पाटील आदी उपस्थित होते.