संपूर्ण जिल्हयात ओला दुष्काळ जाहीर करा; स्व. शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेची मागणी

पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | परतीच्या पावसाने जळगाव जिल्ह्यासह पारोळा तालुका अवकाळी व अतिवृष्टीने हादरून सोडलेला आहे हवेचा वेग विजेचा कडकडाट मुसळधार पाऊस जिल्ह्याचा कापूस पट्टा असलेला शेतकऱ्यांचा पांढरा सोनं असलेले शेतकऱ्यांचा कापूस मातीमोल होऊन प्रत्येक कापसाच्या सरकीवर दोन पानांचा कोण दिसत असून शेतकरी कासावीस होऊन चिंतेने व्याकुळ झालेला आहे.

कपाशी सह मका नुकसानकारक ठरलेला आहे उन्हाळ्यापासून जपलेल्या कापसाला मातीमोल होताना दिसताना, शेतकऱ्यांनी बघितलेल्या स्वप्नांची राख रांगोळी होताना दिसत आहे तरी ओला दुष्काळ जाहीर होऊन शेतकऱ्यांना हेक्टरी 30000 हजार रुपये ओला दुष्काळ अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करावी असे निवेदन व शरद जोशी प्रणित शेतकरी संघटना पारोळा च्या वतीने कृषी अधिकारी कार्यालय तसेच तहसीलदार कार्यालय पारोळा येथे देण्यात आले

यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर पाटील तालुकाध्यक्ष प्राध्यापक भिकाराव पाटील सचिव गुलाब पाटील जिल्हाध्यक्ष स्वभापा अरविंद जी बोरसे संघटक गुलाब पाटील दिलीप पाटील योगेश भोसले कोमल सिंग पाटील किसन राठोड लालसिंग नाम पाटील हिरालाल पाटील हिरामण पाटील हिलाल रामोशी सुनील पाटील विनोद पाटील प्रवीण पाटील इत्यादी बहुसंख्य शेतकरी निवेदन देताना हजर होते

Protected Content