
सांगली (वृत्तसंस्था) पुरानंतर पाचव्या दिवशी मुख्यमंत्री पूरग्रस्तांच्या बचाव कार्याचा आढावा घेण्यासाठी सांगलीत दाखल झाले. मात्र सांगलीतल्या सांगलवाडीत मुख्यमंत्र्यांना पूरग्रस्तांच्या रोषाला सामोरे जावे लागले. मुख्यमंत्री सांगलवाडीत येताच संतप्त पूरग्रस्तांनी घोषणाबाजी सुरु केली. त्यामुळे फडणवीस यांना माघारी परतावे लागले.
दुसरीकडे मुसळधार पाऊस, कोयनेतील विसर्गामुळे पूरग्रस्तस्थिती निर्माण झाली. सांगली आणि कोल्हापूरमधील जनजीवन पूर्वरत करण्यावर सध्या सरकारने भर दिला आहे. विरोधकांनी पूरस्थितीचं राजकारण करू नये. सर्वांनी एकत्र येऊन लोकांना मदत करावी. सरकारच्या उणिवा दाखवून द्या पण राजकारण करू नका, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षनेत्यांना केलं आहे. आपल्याला राजकारण करण्यासाठी बराच वेळ आहे. सध्या राजकारण करण्याची ही योग्य वेळ नव्हे, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे.