चोपडा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | चोपडा तालुक्यातील अडावद येथील इंदिरानगर प्लॉट राहणाऱ्या २२ वर्षीय तरुणाचा अकस्मात मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत चोपडा उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. तृप्ती पाटील यांनी दिलेल्या खबरीवरुन अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत माहिती अशी की, ८ रोजी सकाळी इंदिरानगर प्लॉट भागात राहणाऱ्या पुष्पराज कौतीक कोळी (२२) या तरुणाचा सकाळी १० वाजेच्या सुमारास मृत्यू झाला. त्याला तात्काळ उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. वैद्यकीय अधिकारी यांनी त्यास मृत घोषीत केले. त्यानंतर शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास त्याचेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच या तरुणाच्या मृत्यूचे नेमके कारण समजणार आहे. पुढील तपास सपोनि प्रमोद वाघ हे करित आहेत.