Home राज्य ठाण्यात तीन कामगारांचा गुदमरून मृत्यू

ठाण्यात तीन कामगारांचा गुदमरून मृत्यू

0
61

ठाणे प्रतिनिधी । सेफ्टी टँक साफ करतांना गुदमरून तीन कामगारांचा मृत्यू झाल्याची दुर्घटना ठाणे येथे घडली असून पाच जणांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आहे.

ठाण्यातील ढोकळी नाका परिसरात असणार्‍या प्राईड प्रेसिडन्सी लक्झेरिया या भागात काल मध्यरात्रीच्या सुमारास सेफ्टी टँक साफ करण्याचे काम सुरू होते. यातील टँकमध्ये आठ कामगार उतरले होते. मात्र त्यांना थोड्या वेळातच गुदमरून अस्वस्थ वाटू लागले. यापैकी अमित पहाल, अमन बादल आणि अजय बुंबक या तीन कामगारांचा गुदमरल्याने मृत्यू झाला. तर पाच जण वेळीच बाहेर आल्यामुळे त्यांचे प्राण सुदैवाने वाचले आहेत. या सर्व जणांवर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, शेवटचे वृत्त हाती आले तोवर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून याबाबत गुन्हा नोंदण्याचे काम सुरू होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound