नवाब मलिक यांच्या जावयांचे निधन

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांचा मृत्यू झाला आहे. याची माहिती त्यांनी त्यांच्या एक्स अकाऊंटरवर दिली. ते त्यांची मुलगी निलोफर खान यांचे पती होते. त्यांचा सप्टेंबर महिन्यात कुर्ल्यात एका रुग्णालयाबाहेर भीषण अपघात झाला होता. समीर खान यांच्याच थार गाडीच्या चालकाने थार गाडी समीर खान यांच्या अंगावर चढवली होती.

ॲक्सिलेटरवर चुकून पाय पडल्याने गाडीवरील नियंत्रण सुटल्याचे चालकाने सांगितले होते. या अपघातामध्ये त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. तेव्हापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. या अपघातात निलोफर खान यांच्याही हाताला दुखापत झाली होती. अखेर आज समीर खान यांचे निधन झाले.

समीर खान आणि त्यांची पत्नी निलोफर हे दोघे सप्टेंबर महिन्यात घराजवळील क्रिटी केअर हॉस्पिटलमध्ये नियमित आरोग्य तपासणीसाठी गेले होते. तपासणी झाल्यानंतर दोघेही बाहेर आले. यानंतर समीर खान यांनी चालकाचा वाहन घेऊन येण्यास सांगितले. यावेळी चालकाकडून वाहन घेऊन येताना चुकून ब्रेक ऐवजी ॲक्सिलेटरवर पाय पडला आणि थार जोरात येऊन समीर खान यांना धडकली. यामध्ये समीर खान यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. समीर खान बरेच दिवस आयसीयूमध्ये होते.

Protected Content