जळगाव प्रतिनिधी । घराच्या कौटुंबिक वादातून मंगरूळ येथील ३२ वर्षीय विवाहितेने कंटाळून बुधवारी दुपारी विष घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. आज गुरुवारी पहाटे ५ वाजेच्या सुमारास उपचारादरम्यान विवाहितेचा मृत्यू झाला आहे.
याबाबत माहिती अशी की, प्रतिभा कैलास पाटील (वय ३२ रा. मंगरुळ ता. चोपडा) यांचे पती कैलास पाटील यांच्यात गेल्या चार-पाच वर्षांपासून कौटुंबिक वाद होता. सुरत येथील माहेर असलेल्या विवाहितेने बुधवारी २४ रोजी दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास घरात विषारी औषध घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. नातेवाईकांनी तिला प्राथमिक उपचारासाठी चोपडा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते. मात्र प्रकृती अधिकच खालावल्याने संध्याकाळी सहा वाजता जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल केलेे.आज गुरुवार २५ रोजी सकाळी ५ वाजेच्या सुमारास संबंधीत विवाहितेचा मृत्यू झाला याबाबत एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. प्राथमिक तपास पो.हे.का.श्री खैरनार करीत आहेत.