Home क्राईम विजेच्या धक्क्याने महावितरण कर्मचाऱ्याचा मृत्यू

विजेच्या धक्क्याने महावितरण कर्मचाऱ्याचा मृत्यू

0
132

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील नशिराबाद येथे महावितरणचे काम करीत असताना एका मजुराचा विजेचा धक्का बसून मृत्यू झाला. अशोक तिजू पुराम (वय ३९, रा. सुकडी ता. देवरी जि. गोंदिया, ह. मु. भादली रोड) असे मयत मजुराचे नाव आहे.

महावितरणने भारत इलेक्ट्रिक कंपनी, कुपवाड जि. सांगली या कंपनीला विविध कामांचे कंत्राट दिलेले आहे. या कंपनीचे सुपरवायझर हर्षल कदम (रा. खेडी) यांच्या सांगण्यानुसार काही मजूर नशिराबाद येथे महावितरणचे काम करीत होते. बुधवारी सकाळी बाजारपट्टा भागात काम सुरु असताना अशोक पुराम यांच्याकडून वीज बंद करताना काहीतरी चूक झाली असावी, त्यामुळे सिमेंटच्या खांब्यात विद्युतप्रवाह उतरला आणि अशोक पुराम यांना विजेचा जोरदार धक्का बसला व ते खाली पडले.

सोबतच्या मजुरांनी त्यांना तत्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. यामुळे सोबतच्या मजुरांना धक्का बसला आहे. मयत अशोक पुराम यांच्या कुटुंबियांना गोंदिया येथे कळविण्यात आले. शवविच्छेदन झाल्यावर मृतदेह त्यांच्या गावी सुकडी येथे रवाना झाला आहे. घटनेप्रकरणी नशिराबाद पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


Protected Content

Play sound