भजन गाताना मंचावर अचानक कोसळून गोपाळकृष्ण महाराजांचा मृत्यू

उज्जैन-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | प्रसिद्ध निरुपणकार गोपाळकृष्ण महाराज यांचा श्रीमद्भागवत कथा सांगताना आणि भजन करतानाच मृत्यू झाला. गोपाळकृष्ण महाराज किर्तन करत होते आणि भजन म्हणत होते. त्यावेळी त्यांना हृदयविकाराचा झटका आला ज्यामुळे ते खाली कोसळले. अचानक झालेल्या या घटनेमुळे गोंधळ उडाला.

उज्जैनचे प्रसिद्ध कथाकार भागवताचार्य गोपाळकृष्ण महाराज हे कथा सांगत असताना आणि निरुपण करत असताना अचानक त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. गुरुपौर्णिमा म्हणजेच रविवार दिनांक २१ जुलै या दिवशीच ही घटना घडली. पंडित गोपाळकृष्ण महाराज राजगढ या ठिकाणी त्यांच्या गुरुंच्या समाधीस्थळीच कथा ऐकवत होते, भजन गात होते त्यावेळीच ही घटना घडली. कथा आणि भजनात भक्तगणही तल्लीन झाले होते. त्याचवेळी गोपाळकृष्ण महाराजांना हृदयविकाराचा झटका आला. त्यातच त्यांचा अंत झाला. गोपाळकृष्ण महाराज गात असतानाच त्यांचा आवाज अचानक बंद झाला. त्यांच्याकडे लोकांनी पाहिलं तर त्यांना चक्कर आली आणि ते कोसळले असं लोकांनी पाहिलं. ज्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला. उज्जैनमध्येच त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Protected Content