जळगाव प्रतिनिधी । आईस कँडीमुळे एका बालिकेचा मृत्यू झाला असून दुसरी गंभीर असल्याची धक्कादायक घटना आज घडली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, एरंडोल येथील मेहमूद खान तजम उल्ला खान यांची नात खदीजा शेख इरफान (वय५) आणि सहेर अंजूम शेख इरफान यांनी पेप्सी (आईस कँडी) आणि हवाबंद पाकिटातील खाद्यपदार्थ खाल्ले. यानंतर त्यांना लागलीच अस्वस्थ वाटू लागले. यामुळे त्यांना एरंडोल येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले. तेथील डॉक्टरांनी तातडीने जिल्हा रूग्णालयात पाठविले. येथे खदीजा हिचा मृत्यू झाला असून सहेरची प्रकृती गंभीर आहे. पेप्सीतून विषबाधा झाल्यामुळे हा प्रकार घडला असावा असे प्रथमदर्शनी दिसून आले आहे. दरम्यान, जिल्हा रूग्णालयात खदीजाच्या घरच्यांचा आक्रोश मन हेलावून टाकणारा होता.